जाळुन कागद आठवणींचे
अश्रुंचा असा धुर केला
रिता करुनी कोनाडा भावनांचा
शांत मनीचा काहुर केला

Poetry, Shayari and Gazals
जाळुन कागद आठवणींचे
अश्रुंचा असा धुर केला
रिता करुनी कोनाडा भावनांचा
शांत मनीचा काहुर केला
उभ आयुष्य खपवल
नाही स्वतासाठी जगला
चंदनाची ही उपमा पडे
तोडकि माया बापाला
नव्हती कधीच त्याला
भौतिक सुखाची नवलाई
अभिमानान सांगायचा
लेकर मायी कमाई
साऱ्या जीवनाचा सार
कमी शब्दात सांगायचा
जणु आयुष्य जगायची
संग शिदोरी द्यायचा
ना झुकला कोनापुढे
ना खुशमस्करी मानी
असा जगला माया बाप
सारे म्हणे स्वाभिमानी
ना केली आयुष्यभर
त्यान कामाची कसर
काम येईल जे हाती
पाही त्यामधे ईश्वर
आला निरोप द्यायले
अश्रु त्याचे ओघळले
लेक चालला माया दूर
ना त्याला सोसवले
लेकरांना कमी नको
ईच्छा स्वताच्या मारल्या
माया बापान वेदना
त्याच्या जीवावर काढल्या
चार लोकांत हसुन सांगे
आता झाली मायी कमाई
सोडुन गेला आयुष्यभरासाठी
माया बाप त्याची पुण्याई
जीवनात घेतलेल्या अनुभवाचे धडे
बाप प्रत्येकक्षणी गीरवीत असतो
कळु न देता आपल्या मुलांच्या संगे
आयुष्य जगण्याची शिदोरी देत असतो
अबोल ओठांनाही कधी
नकळत बोल सुटावा
पसारा मनी साठलेला
शब्दांतुन व्यक्त व्हावा
आयुष्य कसे जगायचे
ज्याचे त्याने ठरवायचे
तथ्याचा घ्यायचा शोध की
मृगजळा मागे धावायचे
आयुष्य कोडे
दिस थोडे
सोडता सुटेना
कवितेच्या एका कडव्यात
अगणित भावनांचा पसारा
चार ओळी सांगुन जाती कधी
नकळत आयुष्याचा अर्थ सारा
हवा हि विषारी
कशी हि बिमारी
कुणी ना विचारी
आटली माणुसकी सारी
चिंब चिंब भिजवून जातो
आठवणींचा पाऊस जुन्या
ओल अविस्मरणीय क्षणांची
सोडून जातो नव्याने पुन्हा
शब्दांच्या आहे पलीकडे
जपलेले तुझे नी माझे नाते
वाऱ्याची झुळुकही कधी
निरोप तुझा सांगुन जाते